गोवा बनावटीच्या दारूची कर्नाटक मध्ये तस्करी करण्याचे प्रकार वाढले आहेत.कर्नाटकच्या अबकारी खात्याने आज अनमोड घाटात गोवा बनावटीची दारू पकडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दीड लाखांचा एेवज जप्त करण्यात आला आहे.