प्रो. सुनिल कुमार सिंग यांनी २७ जून रोजी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या संचालकपदाची सुत्रं स्वीकारली. श्री सिंग एनआयओत रुजू होण्यापूर्वी अहमदाबाद येथील फिजीकल रिसर्च लॅबोरेटरी येथे कार्यरत होते. प्रो. सिंग हे सध्या जिओट्रेसेस-इंडिया, कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. या कार्यक्रमांतर्गत सागरी उत्पादकता, सागरी पर्यावरणशास्त्र आणि जागतिक हवामान बदलाचा अभ्यास करण्यात येत आहे.सुनिल कुमार सिंग 2012 च्या नॅशनल जिओसायन्स पुरस्काराचे मानकरी आहेत. तसेच 2016 चा विज्ञान क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेचा शांतीस्वरुप भटनागर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.