महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या एसटी बसेसच्या बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कदंब वाहतूक महामंडळाने आज महाराष्ट्रात ठीकठिकाणी जाणाऱ्या 37 बसेस रद्द केल्या.ज्या बसेस महाराष्ट्रात वस्तीला असतात त्यांना काल सूचना देऊन सीमेवर येण्यास सांगण्यात आले आहे.महाराष्ट्रात बंद दरम्यान आंदोलन भड़कले तर कदंबच्या बसेसचे नुकसान होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती कदंब महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.37 बसेस बंद ठेवण्यात आल्याने महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.