????????????????????????????????????

सरकारी अधिकाऱ्यांना आमदरांच्या घरी बोलावण्यास घातलेल्या निर्बंधाला काँग्रेसने विरोध करत हा विषय विधानसभेत उपस्थित करण्याचे ठरवले आहे.सरकारने ही अधिसूचना मागे घ्यावी अशी मागणी करत काँग्रेसने आज या विषयावर स्थगन प्रस्ताव सादर केला असून हा प्रस्ताव सभापतीनी स्वीकारला नाही तर प्रसंगी सभात्याग केला जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दिला आहे.