भाजप आघाडी सरकारमध्ये सहभागी पक्ष आणि अपक्ष मिळून ठरवणार असलेल्या किमान समान कार्यक्रम आज दुपारी जाहिर केला जाणार आहे.आतापर्यंत अनेकदा हा अजेंडा जाहिर करण्याचा मुहूर्त हुकला होता.काल क्रांती दिनाच्या मुहूर्तावर हा किमान समान कार्यक्रम जाहिर केला जाणार होता.मात्र कालचा मुहूर्त सुद्धा त्यांना साधता आला नाही.दरम्यान गोवा फॉरवर्ड पक्षाने मात्र किमान समान कार्यक्रमासाठी अनेक मुद्दे काढले असून आपली तयारी पूर्ण केली आहे.आज दुपारी भाजप आघाडी सरकार मधील घटक पक्ष कोणत्या समान अजेंड्यावर एकत्र काम करणार आहेत हे स्पष्ट होणार आहे.