फक्त कुळांचे खटले हाताळण्यासाठी लवकरच विशेष मामलेदारांच्या जलद न्यायालयांची स्थापना केली जाणार आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज यांची घोषणा केली.कुळांचे सगळे खटले पुन्हा मामलेदारांच्या न्यायालयात येतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.कायदा विभागाने तशी तरतूद केली आहे.