फोंडा:कुळे येथे 29 एप्रिल रोजी रेल्वे रुळावर आढळलेल्या मृताच्या खुन्याला जेरबंद करण्यात कुळे पोलिसांना यश आले आहे.या खून प्रकरणी कोले पोलिसांनी निंगप्पा हीरालाल या गदग,कर्नाटक येथील संशयिताला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून अटक केली आहे.

निंगप्पा याने बागलकोट-कर्नाटक येथील सन्मेश पाटिल याचा खून करून त्याचा मृतदेह कुळे येथील रेल्वे रुळावर टाकला होता.आपल्या पत्नीशी सन्मेशचे संबंध असल्याच्या संशय निंगप्पा याला होता.त्यातूनच त्याने सन्मेशचा काटा काढला.21 एप्रिल रोजी निंगप्पा सन्मेश सोबत होता.दोघांनी दूधसागर येथे भरपूर दारु ढोसली होती.सन्मेश दारुच्या नशेत असताना निंगप्पा ने त्याला संपवून त्याचा मृतदेह कुळे येथे रेल्वे रुळावर टाकला होता.

दोघेही मायनिंग ट्रकवर ड्रायव्हर म्हणून कामाला होते.तिस्क-सावर्डे येथे ते रहायला होते.कुळे पोलिसांनी निंगप्पा याला कणकवली येथून अटक केली.तेथे तो दगड़ाच्या खाणीवर चालक म्हणून काम करत होता अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली.पोलिस निरीक्षक नीलेश धायकोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खुनाचा छडा लावण्यात महत्वाची भूमिका बजावली.