गेल्या 2 वर्षात कॅसिनोमुळे मिळणाऱ्या महसुलात दुप्पट वाढ झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.कॅसिनोचा आणि किनारी राज्यांमधील गुन्हेगारी घटनांचा कोणताही संबंध नसल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.कॅसिनोमुळे राज्यात गुन्हेगारी वाढली आहे का असा प्रश्न काँग्रेसच्या आमदराने उपस्थित केला होता त्यावर नाही असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले