राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती ठरले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोविंद यांनी तब्बल ६५.६५ टक्के मते मिळवून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला आहे. मीरा कुमार यांना ३५.४३ टक्के मते मिळाली. दरम्यान, २५ जुलै रोजी कोविंद हे राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.