दक्षिण गोव्यात सुरु असलेल्या धार्मिक प्रतिकांच्या मोडतोड़ीची मालिक थांबवण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे.रोज मोडतोड़ीच्या घटना घडत असून पोलिसांना त्या समाजकंटकांना जेरबंद करणे शक्य झालेले नाही.पोलिसांच्या नाकावर टिच्चून काल रात्री कालकोंडा मडगाव येथील क्रॉसची मोडतोड़ करून पोलिसांना आव्हान दिले आहे.कालकोंडा येथील कृष्ण मंदिरासमोर काही दिवसांपूर्वी मोडतोड़ झालेल्या क्रॉसची समाजकंटकानी पुन्हा मोडतोड़ केल्याने स्थानिक लोक पोलिसांच्या कार्यक्षमते बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.