आरटीओने सुरु केलेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी आज सकाळी खाजगी बस चालकांनी मडगाव येथील कदंब बस स्थानकाच्या प्रवेश आणि बाहेर पड़ण्याच्या मार्गावर बसेस आडव्या लावून रास्ता रोको केला. ऐन वर्दळीच्या वेळी खाजगी बस चालकांनी आंदोलन छेडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.बऱ्याच वेळानंतर बस स्थानकाचे दोन्ही मार्ग मोकळे झाल्यानंतर प्रवाशांनी सूटकेचा निश्वास सोडला.