मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये राज्यातील आयटीआय मध्ये 21 प्रशिक्षक नेमण्यास मंजूरी देण्यात आली.या निर्णयामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांची संख्या 700 पर्यंत वाढू शकणार आहे.राज्यातील आयटीआयचा दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकार कडून 2.5 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यातुन नवीन सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.झुआरी एग्रो केमिकल्स या कंपनीची औद्योगिक भागीदार म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे.वास्को आयटीआयचा दर्जा वाढवण्याची जबाबदारी झुवारीकडे सोपवण्यात आली आहे.जे विद्यार्थी वास्को आयटीआय मधून उत्तीर्ण होतील त्यांना झुवारी मध्ये सामावून घेतले जाणार आहे.