राज्यातील धार्मिक प्रतिकांच्या मोडतोड़ीची मालिका थांबण्याचे नावच घेत नाही.काल रात्री लोटली येथे 2 क्रॉसची मोडतोड़ करून समाजकंटकांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.आता या घटनेचे राजकारण होऊ लागले आहे.काँग्रेसने पोलिसांवर अविश्वास दाखवत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.माजी आमदार मिकी पाशेको यांनी हे प्रकार काँग्रेस घडवून आणत असल्याचा आरोप केला आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी देखील यासर्व घटनां मागे षडयंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले होते.यात दोषी सापडले तर त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊन प्रसंगी गोळ्या घाला अशी मागणी करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाने राज्यात जेथे जेथे क्रॉसची मोडतोड़ झाली आहे त्यांची पुन्हा उभारणी गोवा फॉरवर्ड तर्फे केली जाईल असे नूतन अध्यक्ष मंत्री विजय सरदेसाई यांनी जाहिर केले आहे.हे प्रकार थांबतील यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राजकीय पक्ष आता त्याचे भांडवल कसे करता येईल याकडे जास्त लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.