गोव्यातील जनता शांतता प्रिय आणि धार्मिक सलोखा जीवापाड जपणारी आहे.इथली शांतता आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही खपवून घेणार नाही.काही विघ्नसंतोषी मंडळी गोव्याचा माहौल बिघडावा म्हणून जाणीव पूर्वक प्रयत्न करत आहेत.त्यांना आपण थारा देता नये असे आवाहन गोमंतकिय पॉप सिंगर हेमा सरदेसाई यांनी आज केले. ऑल फ़ॉर गोवा संघटनेतर्फे येत्या रविवारी मडगाव येथे शांती रॅली काढली जाणार असून मुंबई,दिल्लीचे कलाकार संगीताचा कार्यक्रम सादर करणार असून त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सरदेसाई यांनी नाव न घेता श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक आणि हिंदू अधिवेशनात प्रक्षोभक वक्तव्य करून गेलेल्या साध्वी सरस्वती यांच्या हेतू बद्दल शंका उपस्थित करून गोमंतकिय जनता याला थारा देणार नाही असा विश्वास व्यक्त केला