गोव्यात लवकरच फलोत्पादन वसाहती तयार केल्या जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी आज विधानसभेत दिली. राज्याचे कृषी धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरु असून तरुणाना शेतीतून भरघोस उत्पन्न मिळेल आणि विदेशात होणारे स्थलांतर कमी होईल असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला. माकडांच्या उच्छादामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या समस्येवर तोड़गा काढ़ण्याचा प्रयत्न केला जाईल असे कृषिमंत्री सरदेसाई यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावेळी सांगितले.