राज्यात लागू केल्या जाणाऱ्या जीएसटी कायद्याची आमदारांना माहिती करून देण्यासाठी आयोजित मार्गदर्शन वर्गाला बहुतेक आमदार आणि मंत्र्यांनी हजेरी लावली.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.जीएसटी बाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री पर्रिकर यांनी येत्या 3 महिन्यात जीएसटी बाबत लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर होतील त्याच बरोबर जीएसटी हा कायदा गेमचेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त केला.जवळपास 72 गोमंतकियांनी जीएसटी सोबत स्वतःला जोडून घेतले आहे.सरकारी यंत्रणा जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी सज्ज असली तर उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये अजुन जनजागृती करावी लागत आहे.सरकार सर्व पातळ्यावर जीएसटी साठी सहकार्य करणार असून लोकांच्या अडीचणी त्यामुळे दूर होणार आहेत,याकडे पर्रिकर यांनी लक्ष वेधले.