महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राजकारण करण्यात धन्यता मानत आहे.शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्या ऐवजी सरकार संप फोडण्याचा प्रयत्न करत आहे.सरकारला याची लाज वाटली पाहिजे असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांनी हे सरकार निवडून दिले आहे.मात्र सरकारला आता त्याचा विसर पडला आहे.सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची अंत्ययात्रा काढून रोष व्यक्त करावा लागत आहे.राजकरणी लोक शेतकऱ्यांच्या वाईट दिवसांना जबाबदार आहेत.गेली 50 वर्षे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे,असा आरोप राउत यांनी केला.
50 वर्षात राज्यकर्ते नालायक होते म्हणून 3 वर्षापूर्वी नवीन सरकार लोकांनी सत्तेवर आणले मात्र त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत याबाब राउत यांनी नाराजी व्यक्त केली.

नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर 3 वर्षात 4 हजार शेतकरी आत्महत्या करतात,ही बाब गंभीर असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे.समृद्धि महामार्ग सारख्या प्रकल्पांवर 40 हजार कोटीं रुपये खर्च करण्या ऐवजी शेतकऱ्यांना हमी भाव देणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले.शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी राउत यांनी केली.
सरकारने शेतकरऱ्यांची चेष्टा चालवली असून आता त्याचा उद्रेक होत असल्याचे सांगून राऊत यांनी शेतकऱ्यांचा संप हा महाराष्ट्रात पडलेली ठिणगी आहे.ही ठिणगी देशात भड़कली तर अराजकता माजायला वेळ लागणार नाही असा इशारा राउत यांनी भाजपला दिला आहे.