पोलिस बंदोबस्त वाढवून देखील दक्षिण गोव्यात सुरु असलेले क्रॉसच्या मोडतोड़ीचे प्रकार थांबलेले नाहीत.काल रात्री मडगाव पासून 8 किमी अंतरावर असलेल्या लोटली गावातील क्रॉसची मोडतोड़ करून समाजकंटकांनी पोलिस आणि सरकारला आव्हान दिले आहे.दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी मिळून 9 होली क्रॉसची मोडतोड़ आतापर्यंत झालेली आहे.
काँग्रेसने पोलिसांना यात अपयश येत असल्याने धार्मिक प्रतिमांच्या मोडतोड़ीचा तपास सीबीआई कडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली आहे.गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या घटनेस जबाबदार असलेल्याना दहशतवाद्यांसारखी वागणूक देत दिसताक्षणी गोळ्या झाडायला हव्यात असे मत व्यक्त केले आहे.चर्च संस्था आणि राज्यपालांनी धार्मिक सलोखा जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटु लागले आहेत