दाबोळी विमानतळावर गोवा कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाने 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 24 लाख 20 हजार 500 रूपयांचे सोने जप्त केले. मस्कत येथून ओमान एअरवेजच्या WY-209 या विमानातून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या केरळ येथील प्रवाशाकडून 580 ग्राम सोन्याच्या पट्टया आढळून आल्या ज्यांची किंमत 14 लाख 97 हजार 514 रुपये आहे.त्याशिवाय एअर इंडियाच्या विमानाने दुबई येथून गोव्यात आलेल्या केरळ येथील प्रवाशाकडून 9 लाख 22 हजार 986 रुपये किंमतीचे 348 ग्रामची सोन्याची बिस्किटे आढळून आली. या दोन्ही कारवाया गोवा कस्टमचे आयुक्त आर.मनोहर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आल्या.