दोनापावला समुद्रात सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मच्छीमार बोट उलटून ताळगाव येथील बोटमालक मान्युएल काब्राल (७०) बुडाला तर अन्य दोघे बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दलाने हेलिकॉप्टर तसेच बोटींच्या साह्याने शोधमोहीम सुरू केली. बोटीवरील मदतनीस बसवराज याला वाचवण्यात यश आले. अन्य एक खलाशी सोनू गावस (६०) अद्याप बेपत्ता असून, शोधकार्य सुरू आहे.