दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकांची मोडतोड़ करून पोलिस यंत्रणेला आव्हान देणाऱ्या फ्रांसिस परेराला जेरबंद करून देखील धार्मिक प्रतिकांच्या मोडतोडीचे प्रकार काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.मडकई मधील कारनाळे दफनभूमित अज्ञाताने धार्मिक प्रतिकांची मोडतोड़ करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.कारनाळे दफनभुमी मधील 10 ते 12 क्रॉसची मोडतोड़ करण्यात आल्याची घटना उघड़किस आली आहे.आज स्थानिक लोक दफनभूमित गेले असता ही घटना समोर आली.राज्यात गेली काही वर्षे होत असलेली धार्मिक प्रतिकांची मोडतोड़ केल्याची कबूली परेराने दिल्यानंतर सुटकेचा निश्वास घेतलेल्या पोलिसांसमोर पुन्हा नवीन आव्हान निर्माण झाले आहे.