दक्षिण गोव्यात गेले काही दिवस सुरु असलेल्या धार्मिक प्रतिकांच्या मोडतोड़ प्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने काल रात्री पाठलाग करून कुडचडे येथील फ्रांसिस परेरा याला संशयित म्हणून कुड़तरी येथे आणखी एक मोडतोड़ करण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली आहे.पोलिसांची टीम परेरा याच्या घराची झड़ती घेत असून पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे.दक्षिण गोव्यात मोडतोड़ीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवून देखील समाजकंटक हाती लागत नसल्याने लोकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.