केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय अंटार्क्टीका आणि सागर संशोधन संस्थेने ‘ध्रुवीय विज्ञान’ विषयावर मंगळवार आणि बुधवार रोजी दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.

वास्को येथील संस्थेच्या सभागृहात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय भू-विज्ञान खात्याचे सचिव डॉ एम राजीवन नायर यांच्या हस्ते मंगळवार, 16 मे रोजी सकाळी नऊ वाजता परिषदेचे उदघाटन होणार आहे.

ध्रुवीय विज्ञान विषयावर आयोजित करण्यात आलेली ही अशाप्रकारची पहिलीच परिषद आहे. देशभरातील २५० संशोधक या परिषदेत सहभागी होणार आहेत. संशोधकांमध्ये संशोधनाविषयी परस्परांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

क्रस्ट्ल विकास आणि पुनःनिर्माण, अंतराळ हवामान, हवामानशास्त्र आण सागरी प्रक्रिया, पर्यावरणीय बदल अशा विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे.