पच्छिमे कडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वाढलेला जोर आणि पच्छिम मध्यप्रदेश मध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे येत्या 3 ते 4 दिवसात गोवा आणि तळ कोकणात मूसळधार पाऊस पडेल असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे.

दक्षिण गोव्यात काल रात्री झालेला मूसळधार पाऊस हा पच्छिम मध्यप्रदेश मध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम असल्याचे पणजी वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ राहुल एम. यांनी सांगितले.
पच्छिमे कडून वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर वाढला असून त्याला पच्छिम मध्यप्रदेश मध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाची जोड़ मिळाली आसल्याने दक्षिण गोव्यात आणि तळ कोकणात काल मूसळधार पाऊस झाला.दक्षिण गोव्यातील अनेक भागात नद्या दुथडी भरून वाहत होत्या.पारोडा येथील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरिल वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली होती.
गोव्याच्या किनारी भागात जोरदार वारे वाहत होते.समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.

येत्या 3 ते 4 दिवसात मूसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.पच्छिमी वारे आणि पच्छिम मध्यप्रदेश मधील कमी दाबाच्या पट्टयाचा प्रभाव कमी होई पर्यंत जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता पणजी वेधशाळेने वर्तवली आहे.