गोवा टपाल क्षेत्रीय कार्यालय आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष टपाल तिकीट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी हा महोत्सव पणजी येथील मेक्विनीझ पॅलेस येथे साजरा होणार आहे.

या महोत्सवामध्ये ‘आयुष’ या संकल्पनेवर आधारित टपाल तिकीट प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याशिवाय आयुर्वेद, निसर्गोपचार आणि टपाल तिकिटांचा संग्रह या विषयांवर चर्चा देखील आयोजित करण्यात आली आहे. या महोत्सवामध्ये मुंबई स्थित राजा रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय कर्करोग आयुर्वेद संशोधन संस्था, केंद्रीय आयुर्वेद शास्त्र संशोधन संस्थान- सीसीआरएएस, आयुष मंत्रालय व राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे अशा संस्थांचे प्रदर्शन स्टॉल्स देखील असतील.

इतर आकर्षणाचे विषय म्हणजे ‘सेल्फी कॉर्नर’, जादूचे प्रयोग; तसेच निसर्गोपचार पद्धतीप्रमाणे सात्विक अन्नपदार्थांची चव या महोत्सवात चाखायला मिळणार आहे.

गोव्याच्या टपाल विभागाने या महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे.