ओडिशा येथील तिघे आणि झारखंड येथील एका अल्पवयीनाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 14 किलो गांजा मळा-पणजी येथील एका घरातून जप्त केले. जप्त केलेल्या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 7 लाख 15 हजार रुपये आहे.अटक केलल्यामध्ये सुभाष माली,रणजीत सिंग आणि तारुज कुमार यांचा समावेश आहे.अल्पवयीनाला अपना घर मध्ये पाठवण्यात आले आहे.चौघेही कामगार म्हणून काम करत होते