18 जुलै पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी 1596 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.हे अधिवेशन 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.15 दिवसांच्या अधिवेशनात 1596 प्रश्न चर्चेत येणार आहेत.यातील 590 प्रश्न तारांकित असून 1006 प्रश्न अतारांकित आहेत.गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. मार्च अधिवेशनात सादर झालेल्या बजेटवर पावसाळी अधिवेशनात चर्चा, मतदान आणि मागण्या लक्षात घेऊन मंजूर केले जाणार आहे.पावसाळी अधिवेशनात मामलेदारांकडून कुळ मुंडकारांच्या केसेस मागे घेणे तसेच माडाला पुन्हा एकदा झाड़ाचा दर्जा देणारी विधेयके मांडली जाणार आहेत