पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या सोनूच्या गाण्याचा वापर केला जात आहे.यातील बहुतेक गाणी मुख्यमंत्री तथा पणजीचे भाजपचे उमेदवार मनोहर पर्रिकर यांना टार्गेट करणारी आहेत.
पणजी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत असलेल्या गिरीश चोडणकर यांचे मित्र संगीतकार सिद्धनाथ बुयाव यांनी आज पर्रिकर यांना टार्गेट करत पणजे तुका भाईचेर(मनोहर पर्रिकर ) भरोसो नाय काय?अशा आशयाचे गीत सोनूच्या चालीवर प्रचार गीत तयार करून ते व्हायरल केले आहे.बुयाव यांनी या गाण्याचे चित्रीकरण मीरामार येथील किनाऱ्यावर रुतलेल्या लकी 7 या कॅसिनो बोटीसमोर करून कॅसिनोच्या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.बुयाव हे पर्रिकर यांचे नातेवाईक असल्याने या गाण्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
गोवा सुरक्षा मंचने देखील प्रचाराचा भाग म्हणून कॅसीनोंसमोर निदर्शने करताना पर्रिकर यांच्यावर नेम साधत मन्नू तुझ्यावर आमचा भरोसा नाय हाय असे गाणे निदर्शने करताना सादर केले होते.