विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या कार्यालयात आढळलेल्या मटका साहित्य प्रकरणी क्राइम ब्रांचने आज बाबू यांचे भाऊ बाबल कवळेकर यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले आहे.मटका प्रकरणी क्राइम ब्रांचने आज बाबू कवळेकर यांची चौकशी केली. त्यानंतर क्राइम ब्रांचने कवळेकर यांचे भाऊ बाबल यांना समन्स बजावून सोमवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजावले आहे.