गोव्यात येऊन कोणी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास मी स्वतः पुढाकार घेऊन त्याविरोधात एफआयआर दाखल करून असले प्रयत्न हाणून पाडेन अशी प्रतिक्रिया गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी विश्व हिंदू परिषदेने बीफ विषयावर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना केले.
भाजप नेतृत्वाने पर्रिकर यांना संरक्षण मंत्री पदावरुन पर्रिकर यांना गोव्यात पाठवले आहे.भाजप नेतृत्वाचा पर्रिकर यांना पूर्ण पाठिंबा असल्याने विश्व हिंदू परिषदेच्या मागणी कडे कोणी लक्ष देतील असे वाटत नाही असे लोबो म्हणाले.
गोव्यात काही ख्रिश्चन बीफ खतात काही खात नाही.काही हिंदू सुद्धा बीफ खातात त्यामुळे कोणी काही खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.त्यात कोणी हस्तक्षेप करण्याची गरज नाही असे लोबो म्हणाले.