गोव्याच्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.आज किंवा उद्या दुपारपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.उद्या तो जाहिर केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. पर्रिकर उद्या सायंकाळी आपल्या खाजगी कार्यक्रमासाठी अमेरिकेत जात आहेत.त्यापूर्वी भाजप उमेदवारीसाठी गोवा प्रदेश तर्फे निश्चित झालेले नाव जाहिर करून केंद्रीय समितिकडे पाठवले जाणार आहे.भाजपने आज सहयोगी पक्षांसोबत चर्चा केली. त्यांना उमेदवाराची माहिती देण्यात आली असून उद्या त्याची घोषणा केली जाईल असे पर्रिकर यांनी सांगितले.पर्रिकर हे एका आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यावर जात असले तरी त्यांच्या गैरहजेरीत त्यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे कोणाकड़ेही सोपवली नाहीत.फोनवरुन आपण सगळा कारभार हाताळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत