भाजप आघाडीतर्फे राज्यसभेची उमेदवारी विनय तेंडुलकर यांना देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.,तेंडुलकर हे भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत.आज सायंकाळी त्यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.,मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उद्या पासून आठवडाभर अमेरिका दौऱ्यावर असल्याने भाजप आघडीच्या राज्यसभा उमेदवाराची घोषणा आजच होणार आहे.तेंडुलकर यांनी पक्षासाठी केलेला त्याग लक्षात घेऊन त्यांचा उमेदवारीसाठी विचार झाला असावा असे सूत्राचे म्हणणे आहे.2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजप नेते राज्यसभेसाठी इच्छुक होते.पणजी मतदारसंघ पर्रिकर यांच्यासाठी सोडणाऱ्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचेही नाव मध्यंतरी चर्चेत होते