पणजी:गोव्यात आज सकाळी गडगडाटासह झालेला पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस नव्हता.सध्या उन्हाळा सुरु असल्याने हा अवकाळी पाऊस असून मान्सून गोव्यात 6 जून पर्यंत धड़केल असा अंदाज गोवा वेधशाळेचे संचालक तथा संशोधक मोहन लाल साहू यांनी स्पष्ट केले.
गेल्या 24 तासात वाळपई मध्ये सर्वाधिक 42 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.आज रात्री काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

उद्या गोव्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे.त्यानंतर 2 दिवस आकाश स्वच्छ असणार आहे.पाचव्या दिवशी पुन्हा तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.