पेडणे मालपे पेडणे येथे १४ रो जी रात्रो मारुती ओमनी व टोयेटा यांच्यात अपघात होऊन कणकवली कलमठ येथील मनोज नाडकर्णी हे ठार झाले.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली येथील मनोज माधव नाडकर्णी ५० वर्षीय आपली पर्यटन मारुनी ओमनी एम एच ०७ q ३७०६ हे वाहन पर्यटकांना घेऊन गोव्यात आल्यानंतर ते १४ रोजी रात्रो परत कणकवलीला निघाले होते त्यावेळी रात्रो ११ .३० वाजता विरुद्ध दिशेने टोयेटा जी ए ०३आर ७९९७ या वाहनाला धडक लागली व मारुती ओमनी मधील चालक मनोज गंभीर जखमी झाला .

त्याला म्हापुसा जिल्हा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले तर डॉक्टारांनी मृत घोषित केले, त्या वाहनातील आणखी एक जखमी झाला त्याचा पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला परस्पर मुंबईला उपचारासाठी नेल्याने त्याचे नाव कळू शकले नाही.

दुसऱ्या टोयेटा वाहनातील दोघाना किरकोळ जखम जाली त्याच्यावर उपचार करून त्याना दिस्चार्जे दिला,.पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला