भाजप आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम आज जाहिर करण्यात आला.या कार्यक्रमावर गोवा फॉरवर्ड पक्षाची छाप स्पष्टपणे दिसून येत आहे.गोवा फॉरवर्ड पक्षाने माडाला गवत ठरवण्याच्या पूर्वीच्या भाजप सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करून माडांच्या रक्षणाचा मुद्दा घेऊन माड़ यात्रा काढली होती.विद्यमान भाजप आघाडी सरकारने माडाला राज्य वृक्ष म्हणून दर्जा देण्याचे किमान समान कार्यक्रमात ठरवले आहे.स्थानिक शेतकऱ्याच्या शेत मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी हाइवे शेजारी शेती माल बाजार उभारण्यावर घटक पक्षांचे एकमत झाले आहे.2022 पर्यंत सगळ्यांना घर हा निर्धार करून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.झोपड़पट्टयांचे पुनर्वसन केले जाणार असून जमीन वापर धोरण केंद्रीभूत ठेवून 2030 हा प्रादेशिक आराखडा तयार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.