मीरामार सर्कल ते दोनापावल सर्कल पर्यंतच्या रस्त्याची स्वछता कॅम इंडस्ट्रियल सर्व्हिसेस एलएलपी या कंपनीतर्फे कॉरपोरेट सोशल रिस्पांसिबिलिटी अंतर्गत केली जाणार आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितित आज या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्लास्टिकचा वापर कमी करण्याबरोबर आपल्या भागाची स्वच्छता राखण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर,महापौर सुरेंद्र फुर्तादो,नगरसेवक शीतल नाईक, किशोर शास्त्री,पुंडलिक राऊत देसाई आदि उपस्थित होते.