पोटनिवडणुक आचारसंहिता सुरु झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आपल्या सरकारी निवासस्थानी मतदारांच्या गाठीभेटी घेत असून ही गंभीर बाब असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.नाईक म्हणाले,विधानसभा अधिवेशनात देखील पर्रिकर यांनी गरजेपेक्षा मोठी भाषणे केली, दुसऱ्यांच्या प्रश्नात अनेकदा हस्तक्षेप करून स्थानिक न्यूज चैनल मार्फत लोकांपर्यंत पोचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला ही बाब खटकणारी आहे.नाईक यांनी पर्रिकर यांच्या संरक्षणमंत्री पदावरील कामगीरीबाबत संशय व्यक्त केला. सर्जिकल स्टाइकचे श्रेय आरएसएसला दिल्या बद्दल पर्रिकर यांच्यावर टिका करताना हा सैनीकांचा अपमान होता असे नाईक यांनी निदर्शनास आणून दिले. पर्रिकर यांना संरक्षण मंत्री कोणी विचारात घेत नव्हते आणि काश्मिर सारखे प्रश्न त्यांना सोडवता येत नव्हते त्यामुळे त्यांनी एवढे मोठे पद सोडून गोव्यात परतणे पसंत केले असावे असा दावा नाईक यांनी यावेळी केला.