केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृवाखालील एनडीए सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे.केवळ दिखावा करण्यात मोदी सरकार आघाडीवर असून जनतेला बुरे दिन अनुभवावे लागत असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी आज केला.स्पंदना यांनी मोदी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.देशात भाजप राजवट असलेल्या ठिकाणी घोटाळे झाले मात्र दोषीवर कारवाई झाली नाही.शेतकऱ्यांचे हित साधण्यात मोदी सरकारला अपयश आल्याने शेतकरी आत्महत्या करू लागले असल्याचा आरोप करून स्पंदना म्हणाल्या,नोकऱ्या देतो असे सांगून मोदी सरकार ने तरुणांची फसवणूक केली आहे.सीमे पलिकडून होणारे हल्ले थांबण्यात सरकार अपयशी ठरले असून परराष्ट्र धोरण कुचकामी ठरले आहे.’मोदी सरकारच्या राजवटी मध्ये विरोधकांचा आवाज दाबला जात असल्या बद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.