गोवा राज्य शिवसेनेतर्फे आज डीआयजी रुपिंदर कुमार यांची पोलिस मुख्यालयात भेट घेऊन राज्यात बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करून ती लवकरात लवकर सुधारण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. शिवसेना राज्य प्रमुख शिवप्रसाद जोशी, उप प्रमुख जितेश कामत, उत्तर जिल्हा प्रमुख किशोर राव, माधव विर्डीकर, सुरज वेर्णेकर, मनोज सावंत, झायगल लोबो, वंदना लोबो, मंदार पार्सेकर, अरविंद सिंग आणि इतर पदाधिकारी हजर होते .
शिवसेना राज्य प्रमुख जोशी यांनी पर्यटकांवर होणारे हल्ले आणि धार्मिक स्थंळाची होणारी तोडफोड याबद्दल चिंता व्यक्त केली. मंगळसुत्र लुटणाऱ्यांच्या टोळीचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.या टोळीकडून काल पणजीत दूपारी ३-३० वाजता दोन वेगवेगळ्या ठिकाणावर घडलेल्या प्रकरणांची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांना देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.पोलिस आकार्यक्षम असल्याने पीड़ित महिला पोलिसांकडे याची तक्रार करण्यास तयार होत नाहीत याकडे जोशी यानी डीआयजीचे लक्ष वेधले.
लोकांचा पोलिसप्रंती असलेला अविश्वास दूर करण्यासाठी गरज असून त्यादुष्टीने पावले उचलून लगेच सदर टोळी पकडण्याची गरज यावेळी शिवसेने कडून व्यक्त करण्यात आली. पुर्ण शहरात ठिकठिकाणी दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असुन त्या चोराना पकडणे मुश्कील नसल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी डीआयजीच्या निदर्शनासआणुन दिले.
उत्तर जिल्हा प्रमुख किशोर राव यांनी मटका, अमली पदार्थ आणि वेश्या व्यवसायाच्या मुद्दा उपस्थित करून कारवाईची मागणी केली.राव यांनी मटका सर्रास चालू असुन त्यांना स्थानिक पोलिसांच्या कृपाशिर्वाद आहे. अंमली पदार्थ किनारी भागातुन आता सत्तरीच्या केरी गांवापर्यंत पोहोचला आहे. ही पुढच्या पिढीसाठी चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले. वेश्याव्यवसाया मुळे गोव्याचे परशुराम भुमी म्हणून असलेले पवित्र नाव बदनाम होत आहे. भाजपाच्या राज्यात गुन्हेगारीचा कळस झाला आहे असा आरोप राव यांनी केला.
डीआयजी कुमार यांनी शिष्टमंडळाला वेशाव्यवसाय संपवायला ठोस पावले पोलिस उचलत असून अनेक ठिकाणी छापे टाकण्याचे सत्र चालू आहे. चोरी घरफोडी आणि इतर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी पोलिस पेट्रोलींग वाढवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
धार्मिक स्थळाच्या तोडफोडीचा विषय पोलिसांनी गांभीर्याने घेतला असून सीसीटीव्ही फुटेज घेऊन मंगळसुत्र चोरणाऱ्या टोळीस त्वरीत अटक करण्याचे निर्देश देणार असल्याची ग्वाही डीआयजींनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.