एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद उद्या एका दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितित भाजपच्या सर्व आमदारांची बैठक दक्षिण गोव्यातील बोगमाळो येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकी मध्ये मुख्यमंत्री पर्रिकर भाजप आमदारांना कोविंद यांच्या बद्दल माहिती देणार आहेत.कोविंद हे भाजप आघडीमध्ये सहभागी पक्षांच्या आमदारांना देखील भेटण्याची शक्यता आहे.