राष्ट्रपती पदासाठी आज होत असलेल्या निवडणूकिसाठी गोव्यात मतदानाला सुरुवात झाली आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे अजुन गोवा विधानसभेचे सदस्य नसले तरी ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून मतदान केले. गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजप आघडी आणि काँग्रेसचे आमदार मतदान करत आहेत.काँग्रेस राज्यसभा सदस्य तथा गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिल्ली येथे मतदान केले