वाळपई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे समर्थक परवीन शेख या मुस्लिम महिला नगरसेविकेची एकमताने निवड झाली.परवीन शेख यांच्यासह 8 नगरसेवक विश्वजीत राणे यांच्यासोबत भाजप मध्ये आले होते.पालिकेत भाजपचे 2 नगरसेवक आहेत.आतापर्यंत वाळपई नगरपालिका कधीच भाजपच्या ताब्यात आली नव्हती.राणे भाजप मध्ये आल्यानंतर प्रथमच वाळपई नगरपालिका भाजपकडे आली आहे.शेख यांच्या रूपाने पहिली मुस्लिम नगराध्यक्ष भाजपला लाभली असून भाजपला आपली प्रतिमा बदलण्यास त्याचा फायदा होईल असे मानले जात आहे.