विधानसभा संकुलातील कामचुकार कर्मचारी काल सभापती प्रमोद सावंत यांच्या रडारवर आले.

विधानसभा संकुलातील त्या 33 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा असे निर्देश सभापती सावंत यांनी आज विधानसभा सचिवांना दिले.काल सायंकाळी सभापती सावंत यांनी विधानसभा संकुलाला अकस्मात भेट देऊन पाहणी केली होती त्यावेळी 33 कर्मचारी वेळेपूर्वी घरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.

ऑफिस सुटण्याची वेळ 5.45 असताना त्यापूर्वीच 33 कर्मचारी घरी निघून गेले होते.आज सभापतींनी बायोमेट्रिक तपासणी केली असता त्यात ही बाब स्पष्ट झाली.त्याची गंभीर दखल घेऊन सभापतींनी त्या 33 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.