धार्मिक विधी आयोजित करण्यावरुन फोंडा तालुक्यातील सातेरीमळ-निरंकाल येथील स्थानिकांमध्ये दोन गट पडले आहेत.त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला असून परिस्थितिवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.देवस्थानचा वार्षिक उत्सव कधी करायचा यावरून गावकरांमध्ये दोन गट पडले आहेत.एका गटाने आज वर्षिक उत्सव आयोजित करण्याची तयारी चालवली आहे तर दूसरा गट त्याला विरोध करत आहे. त्या गटाच्या मते वर्षिक उत्सव जुलै मध्ये व्हायला हवा. उपजिल्हाधिकारी नवनाथ नाईक आणि पोलिस निरीक्षक सुदेश नाईक घटनास्थळावर असून परिस्थितिवर लक्ष ठेवून आहेत.