सावर्डे पदपुल दुर्घटनेमध्ये काल 50 जण नदीत कोसळल्याची भीती व्यक्त केली जात होती.बचाव पथकाला 14 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात काल यश आले होते.शिवाय संध्याकाळी एक आणि मध्यरात्री अडीच वाजता एक मिळून 2 मृतदेह बाहेर काढणे बचाव पथकाला शक्य झाले होते.काल मध्यरात्री नंतर दूसरा मृतदेह सापडल्या नंतर शोध कार्य थांबवण्यात आले होते.आज सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु करण्यात आले मात्र शोध पथकाच्या पदरी निराशा आली.दुपारी 2 पर्यंत आणखी मृतदेह बाहेर काढणे बचाव पथकांना शक्य झाले नाही.सकाळी नौदलाच्या हेलीकॉप्टरची मदत घेऊन शोध घेण्यात आला.दुपारी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.त्यानंतर बचाव आणि शोध पथक यशस्वी होते का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.