सावर्डे पदपुल दुर्घटने मध्ये मुळ झारखंड येथील अजित प्रकाश इक्का (28) याचा बळी गेला.अजितचा मृतदेह काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पदपुल कोसळला होता तेथून जवळच आढळून आला.नौदलाच्या डायवरनी काल हा मृतदेह पाण्यातुन बाहेर काढला.त्यानंतर 3 वाजता शोध मोहिम थांबवण्यात आली होती.आज सकाळी साडे सहा वाजल्या पासून पुन्हा शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.आला.नौदलाच्या हेलीकॉप्टरची मदत शोधकार्यात घेण्यात येत आहे.आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह अजुन हाती लगलेला नसून त्याचा शोध घेतला जात आहे.झुआरी नदीच्या पाण्यात मगरी असल्याने शोध मोहिम राबवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागत आहे.राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीचे पथक थोड्याच वेळात घटना स्थळावर दाखल होणार असून शोधकार्यात मदत करणार आहे.