मांडवी नदीतील 6 व्या कॅसिनोला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना आज 6 वा तरंगता कॅसिनो मांडवी नदीत दाखल झाला.हरयाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा यांच्या मालकिचा हा कॅसिनो आहे.एमव्ही लकी सेव्हन नावाचे कॅसिनो जहाज आज दुपारी मांडवी नदीत नांगरण्यात आले. मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथून दुपारी आलेले कॅसिनो जहाज वेरे-बेतीच्या भागात नांगरण्यात आले आहे.कॅप्टन ऑफ पोर्टने ही जागा निश्चित करून दिली आहे.बार्ज मालक संघटना आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने अलीकडेच मांडवी मधील 6 व्या कॅसिनोला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले होते.तरीही सरकारने परवानगी दिल्याने पणजी येथील मांडवी नदीत आणखी एका कॅसिनो जहाजाची भर पडली आहे