गोमंतकाचे भाग्य विधाते भाऊसाहेब बांदोडकर यांनी या भूमीतील भुमिपुत्राना बहुजनसमाजाला सन्मानाने जगता यावे यासाठी कुळ कायदा अमलात आणला ,कसेल त्याची जमीन आणि राहील त्यांचे घर हा कायदा बहुजनांचे हित पाहून केला ,त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्याऐवजी दुरुस्ती विधेयक आणून कायदा बदलण्याचा  जो प्रयज्ञ सरकारने चालवला आहे त्याला गोमंतकीय जनता कधीही माफ करणार नाही , बांडोडकरांचे स्वप्न ज्यावेळी पूर्ण होईल त्याच वेळी त्याना खरी आदरांजली ठरणार आहे .असे उदगार माजी सरपंच नारायण उर्फ झिला मयेकर यांनी काढले.

पेडणे पालिका कार्यालयात भाऊसाहेब बांदोडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली ,त्यावेळी आदरांजली वाहताना मयेकर बोलत होते ,यावेळी उपनगराध्यक्ष दीपक मांद्रेकर , नगरसेवक सिद्धेश पेडणेकर , कांता आसोलकर ,श्री आपुले आदी उपस्थित होते .

मयेकर यांनी पुढे बोलताना भाऊसाहेब बांदोडकर यांनी गावागावात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करून बहुजनाना सुशिक्षित करण्याचा प्रयज्ञ केला ,भाटकार शाहीतून कुळ मुंडकार यांची मुक्तता व्हावी यासाठी दुरदृस्ठी ठेवून कायदा आणला ,अर्धे शतक गोवा मुक्त होवून उलटले तरीही अजूनही कुळांच्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या नाहीत , निदान सरकारने आतातरी त्या नावावर करून बांडोद्कारांचे स्वप्न पूर्ण करावे अशी मागणी केली , यावेळी नगरसेवक सिद्धेश पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली .